आष्टी मतदार संघात आ. बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक ग्रामपंचायतीत विजय.

 आष्टी मतदार संघात आ. बाळासाहेब आजबे  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक ग्रामपंचायतीत विजय.                               --------------------------------------------------    



    

                    आष्टी (प्रतिनिधी):- आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक ग्रामपंचायत निवडून आल्या आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सर्व विजयी सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्य उमेदवारांना फेटे बांधून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मतदार संघातील विजयी ग्रामपंचायत पैकी शोभा निमगाव, कोहिणी, सराटे वडगाव, शेडाळा, वेलतुरी, लमान तांडा, धानोरा, गंगादेवी, पिंपरी घुमरी, शिराळ, चिखली, करंजी, बीड सांगवी, भाळवणी, पिंपरखेड, पिंपळगाव घाट, घोंगडेवाडी, दैठणा, देवळाली, मसोबावाडी, चिंचाळा, कापसी, शेरी खुर्द, अंभोरा, बांधखेल, हातोळण, मातकुळी, वाहीरा, किन्ही, बाळेवाडी,या आ आजबे यांच्या ताब्यात तर आष्टी तालुक्यात आजबे व धोंडे साहेबांच्या गटाबरोबर एकत्रित आलेल्या ग्रामपंचायत जळगाव, शिरापूर, बावी, रोहिणी, दौलावडगाव, मातावळी, नांदूर पाटसरा, हिंगणी, तर आष्टी तालुक्यात सुरेश धस यांच्या गटाबरोबर आलेली ग्रामपंचायत केळसांगवी, तसेच पाटोदा तालुक्यात आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायती महासांगवी, डोंगर किन्ही, नायगाव, गवळवाडी, थेरला, डोंगरी, भायाळ, पिठी, कारेगाव पाचेगाव, जवळा, सावरगाव सोने, नफरवाडी, शिरूर तालुक्यातील आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायती मातुरी , येळंब ब्रह्मगाव, आनंदगाव, शिरूर तालुक्यात आमदार सुरेश धस यांच्याबरोबर एकत्रित आलेल्या ग्रामपंचायती निमगाव, मायंबा, नांदेवली, तर बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायती पैकी कुसळंब, सावरगाव घाट, पांढरवाडी, सकटवाडी, निवडुंगा, लांबरवाडी, या ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत आ. बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघात बाजी मारली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.