शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांचे रस्त्याच्या मागणीकडे शालेय विद्यार्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "चप्पु चलाओ आंदोलन " :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

 शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांचे रस्त्याच्या मागणीकडे शालेय विद्यार्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "चप्पु चलाओ आंदोलन " :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

___



 पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्तिवरील शालेय मुले व ग्रामस्थांना थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ तहसिलप्रशासनाच्या जाणीवपुर्वक हलगर्जीपणामुळेच आली असून संबधित प्रकरणात तहसिलदार रूपाली चौगुले सह ईतर जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच उपविभागीय आधिकारी व तहसिलदार यांनीच शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांच्या वारंवार निवेदन,आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही कारवाई न करता वेठीस धरले असुन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातच घेण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१९ डिसेंबर सोमवार रोजी शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांसह चप्पु घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी चप्पु चलाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर, मिलिंद सरपते,शेख मुबीन,सय्यद आबेद,मुश्ताक शेख ,हमीदखान पठाण, बलभीम उबाळे  सुखदेव सानप , निलेश शिंदे,बाबासाहेब शिंदे,नामदेव शिंदे , परमेश्वर शिंदे,भरत बागडे,पांडु बागडे,विश्वनाथ शिंदे,सुरेखा शिंदे,स्वाती शिंदे,उषा शिंदे,संगीता बागडे,रखमाबाई शिंदे,वत्सला शिंदे,ताराबाई शिंदे व शाळकरी मुले सहभागी होते. निवेदन जिल्हाधिकारी बीड राधाबिनोद शर्मा यांना देण्यात आले. 


मतदानावर बहिष्कार व तराफे जाळल्यानंतर सुद्धा तहसिलदार यांची घटनास्थळी भेट नाही 

___

१३ ऑक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन दरम्यान २ दिवसात अडवणुक केलेला रस्ता खुला करून देण्यात येईल या तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु २ महिने उलटुन सुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळेच २ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जिल्हाप्रशासनाला निवेदन दिल्यानंतर दि.११,डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञाताने तराफे जाळल्यानंतर सुद्धा घटनास्थळी भेट नाही एकंदरीतच तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या संवेदना बोथट झाल्या असून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 


जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात यावी:- डाॅ.गणेश ढवळे 

___

तहसिलदार रूपाली चौगुले यांचे शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष आणि दि.१६ डिसेंबर रोजी उपविभागीय आधिकारी प्रमोद कुदळे यांनी आंदोलनकर्ते यांना आढावा बैठकीस बोलावून कोणतीही पुर्व सुचना न देताच बैठकीस गैरहजर राहणे तसेच ग्रामस्थांसमोर त्यांची दखल न घेताच निघून जाणे ही आंदोलनकर्ते यांची हेळसांड असून त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नसल्यामुळेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातच आढावा बैठक घेण्यात यावी. 

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अड.प्रज्ञा खोसरे यांची मोलाची मदत 

____

बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य सदस्य अड.प्रज्ञाताई खोसरे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या सोबत बैठक घेऊन शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थांवर जीवघेणा प्रवास करावा लागत असून मुलामुलींच्या शिक्षणासाठी दळणवळणाची सोय करण्यात यावी अशी मागणी लेखी पत्रकाद्वारे केली असून त्यांच्या समवेत गुलरूखजहीन किशवरूद्दीन शेख उपस्थित होत्या. 






दोन दिवसात रस्त्याचे प्रकरण निकाली काढा:- राधाबिनोद शर्मा 

____

जिल्हाधिकारी बीड राधाबिनोद शर्मा यांनी उपविभागीय आधिकारी प्रमोद कुदळे यांना सुनावणी घेऊन दोन दिवसात शिंदेवस्तिवरील रस्त्याचे प्रकरण निकाली काढण्याचे फोनवरून आदेश दिले. 


डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

मो.नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.