लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील*
निलंगा तालुक्यातील भुतमुगळी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतमुगळी या शाळेने प्रतीवर्षाप्रमाने 2022 याही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून यामध्ये कु.श्रुती निलंगे,कु.वैष्णवी चव्हाण, कु.श्रावणी सावंत,कु.प्रणिता सावंत,कु.भक्ती ढगे,कु.दिपाली जानते,दिपाली लोंढे,कु.सानवी बरमदे व ज्ञानेश्वर माने असे 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दरांडे, सदस्य प्रा.वसंतराव कुलकर्णी, व्यवस्थापन समितीच्या सदस्या,शाळेचे मुख्याध्यापक डी.बी.गुंडूरे, शिक्षक गायकवाड व्ही.आर., श्रीमती कोकणे एम.आय., श्रीमती वाघमारे सी.पी., श्रीमती कुलकर्णी डी.डी., श्रीमती मादळे एस.एम.श्री बोयणे के.जी.व जमादार एस.एम.हे उपस्थित होते.यावेळी शिष्यवृत्ती चे वर्ग घेणारे शिक्षक श्रीमती कोकणे, श्रीमती वाघमारे व श्री. गायकवाड यांचा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला*
stay connected