*केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...*

 *केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...*

========================== 


केज (प्रतिनिधी) दि ९ रोजी राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती सह राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम आज जाहिर केला आहे. या ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.


आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, स्थानिक तहसीलदार निवडणूकांची नोटीस १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करतील.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. ५ डिसेंबर रोजी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल.७ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येतील व त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येवून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.१८ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते ५:३० या कालावधीमध्ये मतदान होईल व २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येतील..


केज तालुक्यातील देवगाव, पिंपळगव्हाण, जिवाची वाडी/ तुकूचीवाडी, कोटी, नागझरी, धर्माळा, कासारी, तांबवा, लाडेवडगाव, कळम अंबा, केकतसारणी, चंदन सावरगाव, कुंबेफळ, ढाकेफळ, जोला, पिसेगाव, कानडी माळी, साबला, कोरेगाव, लव्हरी, मसाजोग, शिरुरघाट/ गदळेवाडी,एकुरका, नाव्होली, सांगवी सा, दैठणा, सारणी सां,माळेवाडी, राजेगाव, सारुळ, टाकळी, वरपगाव/ कापरेवाडी, हनुमंत पिंप्री, आनेगाव, बोरगाव, चिंचोली माळी/ सारुखवाडी, मांगवडगाव, हादगाव, केवड,साळेगाव, सोनिजवळा, भाटुंबा,सारणी आ, शेलगाव गांजी, सातेफळ, सोनसांगवी, धनेगाव, बावची, सादोळा, गोटेगाव, जवळबंन, सावळेश्वर, लाडेगाव, कौडगाव, दिपेवडगाव, उमरी, कानडीबदन, इस्थळ, आनंदगाव, सौदाना, डोका, औंरगपुर,आवसगाव, बेलगाव/केळगाव, पळसखेडा इत्यादी गावांचा सहभाग आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.