आष्टी तालुक्यातील रवी काका ढोबळे सह अनेक युवकांचा भारत जोडो यात्रेत सहभाग ....
अनिल मोरे.
राष्ट्रीय पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा काढली असून.
सध्या देशामध्ये अराजकतेचे वातावरण तयार झाले असून सध्या तरुण युवक बेरोजगार झाले आहेत युवकांना कसल्याही प्रकारची नोकरी नसल्यामुळे त्यांना शेतीला सामोरे जावे लागत आहे.
सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असल्यामुळे रोजगार बुडाला महागाई वाढली.
भारत जोडो यात्रेला भारतातून चांगल्या प्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे राहुल गांधी यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळत आहे.
त्यांचे महाराष्ट्रात आगमन झाल्यापासून बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील आष्टी तालुक्यातील अनेक युवक त्यांना पाठिंबा देत आहेत.
आष्टी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात अनेक युवक भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची युवक युवती यांनी आपला सहभाग नोंदवला.
खासदार रजनीताई पाटील ,प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राजेश देशमुख ,बाळासाहेब थोरात , कन्हैया कुमार आदी मान्यवर संपूर्ण देशातून भारत जोडवे यात्रेला आपला सहभाग नोंदवला आहे.
stay connected