सेवा संकल्प हॅपी गृप नागपूर संस्थेच्या वतीने गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुकडोजी महाराज स्नेहांचल कॅन्सर वेदना शमन केंद्र नागपूर येथील रुग्णांसाठी ग्रॉसरी

 


१४ एप्रिल २०२२ सेवा संकल्प हॅपी गृप नागपूर संस्थेच्या वतीने गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुकडोजी महाराज स्नेहांचल कॅन्सर वेदना शमन केंद्र नागपूर येथील रुग्णांसाठी ग्रॉसरी देण्यात आली.महामानवांच्या कार्याची विचारांची देवाणघेवाण झाली . प्रार्थना आणि अल्पोपहार सह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ अंजली देशमुख घंटेवार, आपल्या भाषणात म्हणाल्या,पाण्याचा एक थेंब  समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावतो, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.

स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा.अनेकानेक उपक्रमाची दखल घेऊन आपण आपले काम समाजातील लोकांसाठी सातत्याने सुरू ठेवायचा प्रयत्न करु . असे त्यांनी सांगितले.यावेळी संस्थेच्या वैशाली येवले, गीता शिंदे, अर्चना बारमाटे, कांचन चट्टे, सुनिता कांबळे, पुष्पा चौरे , मिनाक्षी सुखदेवे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.