आधी पत्नीवर प्राणघातक हल्ला,
मग स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न...?
सुदैवाने दोघेही बचावले....!
प्रतीनिघी : संजय पंडित
दि.१३ डोंबिवली(ठाणे) : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार पतीने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमनाथ देवकर असे आरोपी पतीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात राहणारा सोमनाथ देवकर याने चारित्र्याच्या संशयावरुन त्याच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला होता. वंदना देवकर असे पीडित पत्नीचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीवर हल्ला करुन सोमनाथ फरार झाला होता. रामनगर पोलिसांनी सोमनाथच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध घेत होते.
दरम्यान पोलिस सोमनाथच्या शोधात असताना चार दिवसानंतर रामनगर पोलिस ठाण्याला फोन आला की, सोमनाथने स्वत:वरच गोळी झाडली आहे. पोलिस त्याठिकाणी पोहचले. सोमनाथला जखमी अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पोलिस सोमनाथचा शोध घेत होते. तो नाशिकच्या जंगलात पळून गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमचे तपास पथक त्याला शोध होते. मात्र तो काल रात्री घरी आला. घराचे कुलूप तोडून त्याने घरात प्रवेश केला. रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही रिव्हॉल्वर त्याने मध्य प्रदेशातून अवैधरित्या विकत घेतली आहे. त्याचाही तपास सुरु आहे, अशी माहिती रामनगरचे सिनिअर पीआय सचिन सांडभोर यांनी दिली. सोमनाथवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
stay connected