तिघा मित्रांचाअपघातात मृत्यू

 तिघा मित्राचा अपघातात मृत्यू



अहमदनगर -दत्तात्रय आवंतकर


अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मित्राला कार मधून सोडवण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रोलिला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने यात तिघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे एक वाजता श्रीगोंदा काष्टी महामार्गावरील हॉटेल अनन्या समोर घडला आहे.

 या अपघातात राहुल सुरेश आळेकर( वय 22 श्रीगोंदा ), केशव सायकर (वय 22 श्रीगोंदा ), आकाश रावसाहेब खेतमालीस (वय 18 श्रीगोंदा )या तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने हळ हळ व्यक्त होत आहे.

    याबाबत समजलेली माहिती अशी की श्रीगोंदा येथील राहुल आळेकर व आकाश खेतमालीस हे आपला मित्र केशव सायकर याला काष्टी येथे सोडण्यासाठी आपल्या कारने जात असताना हा आपघात झाला. या आपघातत कार चाही चक्का चूर झाला. आपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी मददतीसाठी धाव घेतली

अहमदनगर ते दौंड महामार्गावर एवढ्यात आप घाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आता परेंत शेकडो जणांचा जीव गेला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.