*अंबाजोगाई येथे केज तालुक्यातील पशुधन विभागाचा शेळी गट वाटपाचा कार्यक्रम संपन्न.*
*आपले जिवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेणे गरजेचे.--- डॉ. मसने.*
===================================
केज, प्रतिनिधी
गरीबी आणि श्रीमंती हि एक फार मोठी दरी असुन त्यामुळे आज घडीला श्रीमंत व्यक्ती हा त्याच्या त्याच्या बुध्दिकौशल्यावर श्रीमंतच होत चालला आहे. तर
गरिब व्यक्ती हा रात्रंदिवस काबाड कष्ट करूनही गरीबच असुन त्याची गरिबी हाटायला तयार नाही. म्हणून शासनाने याच सर्व बाबींचा परिपूर्ण अभ्यास करून गोरगरीब जनतेच्या हिताच्या व त्यांचे राहणीमान व जिवनमान उंचवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण व विशेष घटक अशा योजना प्रभावीपणे राबवत असुन त्याची अंमलबजावणी केज तालुक्यात पारदर्शकपणे डॉ. श्रीकृष्ण थळकरी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समीती केज यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. दत्तात्रय मसने पशुधनविकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी- १ आडस, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
टसन २०२०- २१ दुधाळ जनावरे गाय /म्हैस गट व शेळी मेंढी गट या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जा मधून दाखल केलेल्या नाविन्यपूर्ण व विशेष घटक या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची निवड झालेल्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे व शेळी गट वाटपासाठी शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महाराष्ट्र.मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे-१६ यांचे त्यांचे बीड जिल्ह्यातील कार्यालय, अंबाजोगाई येथील शेळी मेंढी विकास प्रक्षेत्र या ठिकाणी करण्यात येते. त्याच अनुशंगाने डॉ दत्तात्रय मसने यांच्या ऊपस्थितीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या शेळी गटांचे वाटप करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की या देशातील व राज्यातील गोर गरीब व मागासवर्गीय जनतेला ईतर समाजाबरोबर आणण्यासाठी त्यांची आर्थिक बाजू भक्कम करणे गरजेचे असल्याने व त्यांना शासनाच्या योजना देणे गरजेचे असल्याचे लक्षात घेवुन शासनाने नाविन्यपूर्ण व विशेष घटक दुधाळ जनावरे म्हणून दुधाळ गाय/म्हैस गट तर शेळी मेंढी गट अशा दोन योजना जिल्हास्तरावरून सुरु असुन या योजना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबण्यात येत आहेत. केज तालुक्यातही याची अंमलबजावणी पारदर्शकपणे होत असुन केज येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार)पं केज चे डॉ. श्रीकृष्ण थळकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे विशेष घटक व नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत.
सन २०२०-२०२१ या वर्षात अनेक जणांनी वरील योजनेसाठी अर्ज केले होते. त्या पैकी पात्र गटांना शेळी गट वाटप करण्यात आले.
त्यापैकी केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथील एक शेळी गट वाटपाचा राहिलेला होता. या शेळी वाटप कार्यक्रमाची समाप्ती दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी केज तालुक्यातील नाव्होली येथील पात्र लाभार्थी सौ. वैशाली महादेव काळे यांच्या गटाने करण्यात आली.
हा गट वाटपाचा कार्यक्रम अंबाजोगाई येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र या ठिकाणी करण्यात आला. या वेळी या ठिकाणचे प्रमुख डॉ. लाखे पशुधन विकास अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र अंबाजोगाई, डॉ. दत्तात्रय मसने , पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना आडस श्रेणी-१ , डॉ. श्रीमती. वर्षा ओव्हाळ पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना यु.वडगाव श्रेणी-१, डॉ. सुनिल यादव. पशुधनविकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना हनुमंत पिंप्री श्रेणी-१ , डॉ. आघाव पी.डी. पशुधनविकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना शिरूर (का.) व याठिकाणी या कामी सहकार्य अरणारे महामंडळाचे सर्व कर्मचारी व लाभार्थी केज तालुक्यातील नाव्होली येथील सौ. वैशाली महादेव काळे यांना या शेळी गटाचे वाटप करताना पत्रकार महादेव काळे त्यांच्या सोबत सचिन बाळशंकर , नविन बाळशंकर , शेख दस्तगीर उपस्थित होते. या वेळी आमच्या प्रतिनीशी बोलताना डॉ. मसने यांनी सांगतले की गोरगरीब जनतेने शासनाच्या सुरु असलेल्या अनेक योजनेचा लाभ घेवुन आपली गरीबी हाटवुन जिवनमान ऊंचवावे.
stay connected