आज श्री क्षेत्र मढी, बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव, श्री वृध्देश्वर देवस्थान ला औरंगाबाद खंडपीठ चे न्यायाधिश मा. दिघेसाहेब यांनी सदिच्छा भेट

आज श्री क्षेत्र मढी, बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव, श्री वृध्देश्वर देवस्थान ला औरंगाबाद खंडपीठ चे न्यायाधिश मा. दिघेसाहेब यांनी सदिच्छा भेट 

(भारत मरकड )श्री क्षेत्र मढी


  आज श्री क्षेत्र मढी, बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज समाधी मंदिर सावरगाव, श्री वृध्देश्वर देवस्थान ला औरंगाबाद खंडपीठ चे न्यायाधिश मा. दिघेसाहेब यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी या संस्थानचे पदाधिकारी हजर होते.

  आता पर्यंत त्यांनी  खुप वेळेस या धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. ते ज्या वेळी धर्मादाय उपयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आयुक्त होते तेंव्हा पासुन या स्थळांवर दर्शनासाठी येत असतात पुणे येथुन ते मुंबई येथे धर्मादाय आयुक्त पण होते. त्या नंतर आता औरंगाबाद याठिकाणी हायकोर्टात न्यायाधिश म्हणुण कार्यरत आहेत आज त्यांनी ब्रम्हचैतन्य चैतन्य कानिफनाथ महाराज संजिवनी समाधी चे दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी विश्वस्त मंडळाचे कौतुक केले कारण या वेळी आल्या नंतर खुप अशी जिर्णोद्धार काम चालु असल्या बद्दल देवस्थान विश्वस्त मंडळाला शुभेच्छा दिल्या यावेळी देवस्थान चे अध्यक्ष तथा श्री क्षेत्र मढी गावचे सरपंच संजयभाऊ मरकड यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्ट चे कोषाध्यक्ष मा. बबनतात्या मरकड सचिव सौ विमल नवनाथ मरकड विश्वस्त श्री भाऊसाहेब मरकड मढी गावचे माजी सरपंच मा. बाबासाहेब मरकड उपस्थित होते. तसेच श्री एकनाथ मरकड, भानाभाऊ मरकड व ग्रामस्थ आणि देवस्थान कर्मचारी सुरक्षा अधिकारी गणेश मरकड, संदिप मरकड, दत्तात्रय मरकड उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.