राजेसाहेब देशमुख यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने बीड जिल्हा काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार ..
राज साहेबांच्या निवडीचे आष्टी मध्ये जोरदार स्वागत.
आष्टी प्रतिनिधी-------अंबाजोगाई येथील काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते तथा माजी शिक्षण सभापती खासदार रजनीताई पाटील यांचे निकटवर्तीय राजेसाहेब देशमुख यांना काँग्रेस पक्षाने जिल्हा अध्यक्षपदाची संधी दिल्याने बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकली जाईल असे मत व्यक्त केले तर वावगे ठरणार नाही देशमुख यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने आष्टी शहरांमध्ये एडवोकेट शार्दुल जोशी, शरद रेडेकर व मित्रपरिवाराने यांच्या निवडीचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. कर्तुत्व वकृत्व आणि नेतृत्व संघटन कौशल्य राज साहेब देशमुख यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा आल्याने नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष प्रत्येक तालुक्यामध्ये गावांमध्ये पोहचल्या शिवाय राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.असा त्रिवेणी संगम असणारे राजेसाहेब देशमुख भाऊ यांची बीड जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने काँग्रेसला पक्षाला बीड जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
stay connected