💥 *२८ आँगस्ट*
*वाढदिवस एका विकासपुरूषाचा*
- बर्याच वर्षापासून आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघ विकासापासून वंचित होता.मतदार संघाचे राजकारण नुसते जाती धर्मावर व दहशतीवर चालत होते,जनतेने नुसते आश्वसन ऐकायचे व या आश्वसनाला बळी पडून मतदान करायचे.वर्षानुवर्षापासून गावागावात वस्ती रस्ते नव्हते व कुठे लाईट व्यवस्थीत चालत नव्हती.पण आज या मतदार संघाला एक विकासपुरूष आमदार भेटले आहेत त्यांचे नाव आमदार बाळासाहेब आजबे काका.या कोरोनाच्या काळातही मी मुंबईला असल्या मुळे पाहतोय की दुसरे कोणी मुंबईला यायचे म्हटल्यावर दहा वेळेस विचार करतात नको गड्या मुंबईला कोरोना जास्त आहे, जायचे टाळावे पण काका तूम्ही स्वतःचा कसलाही विचार न करता मतदार संघातील विविध कामे मंजूर करून आणन्यासाठी मुंबईला दर आठवड्यातून दोन दिवस येत असतात.कसलाही भेदभाव न करता प्रत्येक गटागटात प्रत्येक गावात तुम्ही कामे मंजूर करून दिली. हा तुमचा साधेपणा व खरेपणा आम्हा कार्यकर्त्यांना खूप आवडतो.
काका एवढा सादेपणा कसा ओ तूमचा आम्हां कार्यकर्त्यांना वाटते की तुमचा वाढदिवस हा वाजत गाजत साजरा करावा पण तुम्ही सर्वांना सांगितले की, माझा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्यक्रम करून साजरा करावा.
काका या साधेपणामुळे व खर्यापणामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना गर्व,अभिमान आहे की आम्ही तुमच्या स्वरुपात एक चांगले आमदार व नेते पसंद केले आहे.काका येत्या २८ तारखेला तुमचा वाढदिवस आहे त्या दिवशी तुम्हाला बर्याच सार्या शुभेच्छा येतील त्यामुळे मी आज माझ्या या शब्दानरूपी शुभेच्छा देत आहे, काका तुम्हाला आम्हा सर्व कार्यकर्त्याकंडून खूप सार्या शुभेच्छा तुमचे यापुढील जिवन सुखाचे,समृद्धीचे जावो व तूमच्या हातून आणखीन विकासकामे होऊन जनतेची सेवा घडो हीच ईश्वर चरनी प्रार्थना करतो.
💥काका तुमचा विश्वासू एक छोटा कार्यकर्ता अमर वाळके(मेजर)सुंबेवाडी ता. आष्टी
stay connected