*दौलावडगाव येथिल ग्रामस्थांनी लोकवर्गणी व्दारे बनवला रस्ता*
दौलावडगाव / प्रतिनिधी...
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव अंतर्गत येणारी फसलेवाडी येथिल शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याने निट जाता येत नव्हते.पाणी,चिखल,खासखोलगे असल्याने अदिवाशी प्रमाणे जिवन व्हायचे.या रस्त्याने दोन अडीचशे शेतकऱ्यांना शेती मसागतीसाठी जावे लागते.परंतु रस्त्याअभावी खुप ञास सहन करावे लागत होते. जवळ जवळ दहा फुट खोल असणारा एक ते दिड किलो मिटर पूर्वीचा सालेवडगाव ते दौलावडगाव पादंन रस्ता खरिप व मुरूम टाकून भरून घेतला. हा रस्ता लोकवर्गणी करून ग्रामस्थांनी केला. वारवार ग्रामसभेत ठराव घेऊन व दोन्ही विद्देमान आमदारानां वेळोवेळी सांगून कुणीही या रस्त्याची दखल घेतली नाही.बर्याच शेतकऱ्यांच्या जमिनी इकडे असल्याने शेतात जाता येत नव्हते पिकवलेल धान्य घरी आणता येत नव्हते अशा बर्याच अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते.यामुळे कुण्या पुढाऱ्याच्या अशेवर न बसता छबुराव फसले,शांतीलाल कोहक,सुधाकर कराळे,गिताराम फसले,गणेश फसले,रामराव फसले,शामराव फसले,बाळू कोहक,साहेबा तात्या,शतीष कोहक,सुभाष फसले व इतर शेतकऱ्याच्या सहकार्याने लोकवर्गणी व्दारे रस्ता करून घेतला.
stay connected