रमजान ईदनिमित्त अनावश्यक खरेदी टाळून समाजातील गरजू, गोरगरिबांना मदत करा - जाकीर शेख

रमजान ईदनिमित्त अनावश्यक खरेदी टाळून समाजातील गरजू, गोरगरिबांना मदत करा - जाकीर शेख

आष्टी/तुकाराम गणगे.

जीवनाचा प्रवास सुखाचा करायचा असेल तर शांतता, ऐक्य आणि बंधुत्व या तत्वांचा अंगीकार करुन त्याला वास्तवाची जोड द्यावी लागेल किंबहुना दुःखातही गोड करुन घेणे, ही शहाण्या माणसांची रित असते. ग्रामीण भाग असूनही व प्रचंड संकटे अडचणी असतानाही त्यावर मात करुन विविध जाती, धर्म, पंथ एकत्र गुण्यागोविंदाने राहत आपली गावची सर्वांगीण विकास करताना ऐक्य व बंधुता या मूल्यांचे प्रत्यक्षात आचरण करुन तालुक्यातील बीडसांगवी येथील मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात माणुसकीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे  जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात ही बहुतांश जिल्ह्यात या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्यात ही लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्याच्या उत्तरार्धात कोरोना विषाणूच्या संसर्ग बाधित रुग्णांची संख्या शून्यावरून वाढत गेली. डॉक्टर, फार्मासिस्ट, परिचारिका, पोलीस,सफाई कामगार, पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
   याच पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील मुस्लिम बांधवांनी ऐक्य, समता व बंधुत्व या तत्वांचे पालन करत पवित्र रमजान ईद निमित्त होणारी अनावश्यक खरेदी, अनावश्यक खर्च टाळून सण साजरा करणार आहेत. बचत होणाऱ्या पैशांमधून गरीब, असहाय्य व गरजूंना मदत करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याला आमचे प्रथम प्राधान्य आहे अशी माहिती उद्योगपती व मिलन मंगल कार्यालय आणि लॉन्सचे प्रमुख झाकीर शेख यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.