आ.बाळासाहेब आजबे मित्र मंडळ शिवशंभो गणेश मंडळाच्या मिरवणुकीत कर्नाटकातील चेंडे ढोल पथकाने जिंकली अष्टीकरांचे मने
आष्टी प्रतिनिधी
आष्टी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळ शिवशंभो गणेश मंडळाच्या वतीने सातव्या दिवशी भव्य पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये कर्नाटक येथील चेंडे ढोल व नृत्य पथकाने यावेळी आष्टीकरांची मने जिंकले
आष्टी येथे आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने शिवशंभो गणेश मंडळाची स्थापना करण्यात येते या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सातव्या दिवशी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या उपस्थितीमध्ये हजारो गणेश भक्तांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये हलगी पथक अहमदनगर येथील 100 मुले -मुलींचे गणांत ढोल पथक व खास आकर्षण म्हणून कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध चेंडे ढोल व नृत्य पथक आमंत्रित करण्यात आले होते यावेळी चेंडे पथकाने आष्टी शहरांमध्ये ढोल पथकाच्या वाद्यावर नृत्य करत आष्टीकरांची मने जिंकली, आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते श्री गणेशाच्या मूर्तीची अद्यावत पूजा करून आरती करण्यात आली व सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी आष्टी शहरातील किनारा चौक येथे वेगवेगळ्या पद्धतीच्या आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या होत्या या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या मिरवणुकीसाठी आष्टी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये व शांततेत पार पडली.
stay connected