आष्टीकरांनो परत माझे नाव मतदान यादीत नाही असे ओरडू नका : नवीन मतदार नोंदणी सुरू
आपले मतदार यादीत नाव नोंदवून घ्या - तहसिलदार प्रमोद गायकवाड
आष्टी प्रतिनिधी -
लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुक मतदान नोंदणी वर लक्ष केंद्रित केले असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.आष्टी तालुक्यातील निवडणूक विभाग ही निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.नवमतदारांसाठी नवीन मतदान नोंदणी आपली नावे, फोटो, आणि इतर बाबी दुरूस्ती करता येत आहे.यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.२५ जून पासून मतदान नोंदणी सुरू झाली असून २४ जुलै पर्यंत नोंदणी करता येणार आहे.२० आॅगस्ट ला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.आष्टीकरांनो परत माझे नाव मतदान यादीत नाही असे म्हणू नका नवीन मतदार नोंदणी सुरू झाली आहे.आजच आपले मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
नवमतदारांसाठी संधी मतदान नोंदवण्याची संधी उपलब्ध झाली असून मंगळवार २५ जून पासून मतदान नोंदणी सुरू झाली आहे. २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदार यादीची पडताळणी केंद्रस्तरीय मतदान अधिकार्यांकडून घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. या कालावधीत १ जुलै २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या युवा वर्गास मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, अस्पष्ट अंधुक छायाचित्रे बदलणे, मृत तसेच दुबार मतदारांचे वगळणे, आदी कार्यक्रम पार पडणार आहे. २५ जुलै रोजी एकत्रित पारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्यावरील दावे व हरकती २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेले दावे, हरकती निकाली काढण्यात येतील आणि मंगळवार २० ऑगस्ट रोजी आगामी निवडणूकांसाठी आवश्यक अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी दिली असून आष्टी तालुक्यातील सर्व पात्र नागरीकांनी मतदार नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी घेऊन मतदान यादीतील आपले नाव तपासून आपल्या यादी भाग क्रमांकाचे बीएलओ, तलाठी यांच्याशी संपर्क साधून विहित अर्ज भरून द्यावेत,’’ असे आवाहन तहसिलदार प्रमोद गायकवाड, निवडणूक विभागाचे अव्वल कारकून राजकुमार पवार यांनी केले आहे.
________
मतदार नोंदणी विशेष मोहीम अंतर्गत काय होणार?
■ मतदार यादीमधील चुकांची दुरुस्ती
■ जुने फोटो बदलणे, पत्ता व नावांमध्ये दुरुस्ती
■ मतदान केंद्रांची सीमा निश्चिती
■ भाग याद्यांची पडताळणी करून नव्या मतदान केंद्रांची निर्मिती
■ सचित्र मतदार कार्ड (इपिक कार्ड) मधील चुकांची दुरुस्ती
stay connected