डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १४ एप्रिल रोजी जयंती ही जयंती निव्वळ आपल्या भारत देशात साजरी होत नाही तर तब्बल १५२ देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.
आष्टी तालुक्यातील कडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोत,आणि जयंती साजरी करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांना समता, स्वातंत्र्य, बंधुता हे बहाल केले आहे.
माणसाला माणसाने मानसासारखे वागवले पाहिजे.पूर्विच्या काळात माणसाला माणसासारखे वागवले जात नव्हते.दलित, शोषीत,पिडीत,समाजाला कायमच हीन वागणुक दिली जायची.ज्या तलावात कुत्रे पाणी पित असत, परंतु माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता अशा काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व अंधरुढीला लाथाळुन सर्व मानवाला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार दिला.
अशा या महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
stay connected