सैनिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर ---आमदार सुरेश धस
*******************************
लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या खंबीर पाठीशी मेळाव्यात सैनिकांचा निर्धार
*********************************
आष्टीत आजी-माजी सैनिक वीर माता वीर च्या वीर पत्नी यांचा सैनिक मेळावा संपन्न
*********************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
देशाच्या सीमेवर सैनिक असल्यानेच आम्ही घरात शांत झोपत आहोत.आपल्याला येणाऱ्या अडचणी ह्या आम्ही सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून आपली कसलीही तक्रार किंवा समस्या असेल ती आपण आमच्याकडे न येता सोशल मीडियाद्वारे पाठवली तरी ती सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आमचे ते कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी सैनिकांच्या मेळाव्यात संवाद साधताना केले.
आष्टी येथे आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील सर्व सैनिक बांधवांच्या अडीअडचणी तसेच समस्या जाणून घेण्यासाठी आष्टी शहरातील मोरेश्वर मंगल कार्यालय येथे शनिवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचे महाराष्ट्र कोर कमिटीचे सदस्य महादेव खेडकर व तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास बीड,लातूर,धाराशिव मतदार संघाचे आ.सुरेश आण्णा धस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कापरे महाराज, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आंधळे,त्रिद्ल क्रीडा अध्यक्ष हरिभाऊ चिरके, ज्येष्ठ सल्लागार अब्बास शेख, संचालक सरपंच सतिष ढवळे,कार्याध्यक्ष मुस्तफा शेख, भाऊसाहेब बांगर,महाराष्ट्र राज्याचे कोर कमिटी महादेव खेडकर,लक्ष्मण भोरे कॅप्टन, रामदास पालवे अकबर बेग,गणेश खाडे,शहाजी ढेपे, शिवाजी पवार,आष्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,कार्याध्यक्ष प्रकाश परकाळे, माजी सभापती अंकुश चव्हाण, माजी जि. प. सदस्य महेंद्र तात्या गर्जे,युवा नेते गणेश शिंदे, नगरसेवक शरीफ शेख उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना बहुमताने निवडून आणू असा विश्वास देत सर्व संघटनेच्यावतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे यावेळी जाहीर केले.
यावेळी उपस्थित आजी माजी सैनिक व नातेवाईक यांना संबोधित करताना आ.सुरेश धस पुढे म्हणाले, देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि सैनिक अतिशय संरक्षणात्मक दिशा कडे जात आहे.सैनिकांना मोदी सरकार आल्यापासून अनेक सुखसुविधा देण्याचे निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत.सीमेवरील हल्ल्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सैनिकांना येणाऱ्या अडचणी आम्ही प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी देऊन येणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना आपण सर्व सैनिक वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत व देशाचे हात बळकट करावे असे आवाहनही शेवटी आ.सुरेश धस यांनी केले.
यावेळी आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचे यांच्यासह पदाधिकारी,आजी-माजी सैनिक,वीरमाता,वीर पत्नी,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार महादेव खेडकर यांनी मानले.
stay connected