महाराष्ट्र शासनाच्या हर घर नळ या संकल्पनेतून आलेल्या
जल-जीवन योजनेच्या माध्यमातून रुई नालकोल गावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार- मा. आ. भिमरावजी धोंडे
रुईनालकोल येथे जल-जीवन मिशन योजना - 22-23 चे
मा.आ.भिमरावजी धोंडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन
आष्टी प्रतिनिधी
जलजीवन ही गावाला नवसंजीवनी देणारी योजना असुन या योजनेच्या माध्यमातून गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचे प्रतिपादन मा. आ. भिमरावजी धोंडे यांनी केले.
दीड कोटी रूपयाच्या जलजीवन कामाचे उद्घाटन माजी.आ.भिमरावजी धोंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे पाण्याची टंचाई पाहता माजी.आ.भिमराव धोंडे यानी या गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा म्हणून जलजीवन योजनेच्या माध्यमातून १ कोटी ५२ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला.या कामाचे उद्घाटन सोमवारी मा.आ.धोडे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.सरपंच संजयकाका नालकोल म्हणाले की जलजीवन कामाच्या माध्यमातून आता पाण्याचा प्रश्न मिटणार आहे व भविष्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नसून शंभर टक्के दर्जेदार काम केले जाईल असा विश्वास गावातील जनतेला दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे हुले नाना, तात्यासाहेब नालकोल, उपसरपंच विष्णू मांढरे, उपसभापती नामदेव धोंडे, मा.उपसरपंच अनिल गजघाट, रावसाहेब धोंडे, अजिनाथ कन्हेरकर, योगेश फरांडे, ग्रा.सदस्य सागर फरांडे, शरद पवार, छगन खोडके, किसन फरांडे, राजेश आडकर, संपत कव्हळे, रघुनाथ नालकोल, महादेव धोंडे सर, मारुती शिवरकर, मारुती सत्रे, अजय कापरे, सुरेश बनसोडे, अजिनाथ बोडखे सर,पांडुरंग धोंडे,हरिभाऊ खोडके, अविनाश बनसोडे,मनोज बनसोडे,केशव भिसे सुरज भिसे शिवम नालकोल, डॉ.हनुमंत बनसोडे, सागर धोंडे, नामदेव पवार आदि ग्रामस्थ उपस्थित होते.


stay connected