खुंटेफळ साठवण तलाव कामासंबंधी फकीर कोण ? आणि मुर्गा कोण ?
हे लवकरच दाखवून देऊ... आ.सुरेश धस यांचा आ.बाळासाहेब आजबे यांचेवर पलटवार...
आष्टी (प्रतिनिधी )
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकेल असा असणारा खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाबाबत
मी केलेल्या पाठपुराव्यासंबंधीची (नस्ति) फाईल लवकरच आपणासमोर ठेवून खुंटेफळ साठवण तलाव या योजनेतील...
मुर्गा कोण ? आणि फकीर कोण ? आणि अंडा कोण खात आहे ?
हे पत्रकारांसमोर लवकरच मांडणार आहे ...
असा पलटवार आ. सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला...
आष्टी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.. आ.बाळासाहेब आजबे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाच्या टेंडर बाबत आ.सुरेश धस यांचे वर " मेहनत करे मुर्गा और अंडा खाये फकीर " अशी मल्लिनाथी केली होती.. त्यावर पलटवार करताना..
ते पुढे म्हणाले की,
सध्या दिवाळी हा सण असल्यामुळे आपण सर्वांनाच शुभेच्छा देत आहोत दिवाळी सण साजरा केल्यानंतर आपण खुंटेफळ साठवण तलाव या योजनेबाबतच्या फाईल (नस्ति ) ची सत्यप्रत मागवण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या नुसार.. संबंधित दस्तऐवज प्राप्त होताच आपण पुन्हा एक पत्रकार परिषद आयोजित करून या खुंटेफळ साठवण तलावासाठी केलेल्या पाठपुराव्या संबंधी केलेला पत्रव्यवहार पत्रकारांसमोर सादर करून वस्तुस्थिती समोर आणणार आहोत
या तलावाच्या सर्वेक्षणापासून ते मंजुरी पर्यंत आपण स्वतः शासन दरबारी प्रयत्न केलेले असून आ.बाळासाहेब आजबे यांनी या कामासाठी काय काय केले आहे ? ते सांगावे माझ्या पत्रानंतरच या कामासंबंधीची फाईल पुढे सरकली असून नंतरच कार्यवाही झालेली आहे यासंबंधीचे दस्तऐवज प्राप्त करत असून आ. बाळासाहेब आजबे यांनी त्यांचे कडील पाठपुरावा केल्यासंबंधीचे दस्तऐवज दाखवावेत त्यानंतरच त्यांनी याबाबत बोलणे योग्य होईल असे सांगून...
शिंपोरा ते थेट खुंटेफळ साठवण तलावासाठीच्या जलवाहिनीच्या कामाचे टेंडर आ.बाळासाहेब आजबे यांनी.. ईपीसी पद्धतीने टेंडर निघावे अशी मागणी केली होती ..
ती रद्द होऊन माझ्या मागणीप्रमाणे या जलवाहिनी कामाचे बी-1 पद्धतीने टेंडर काढण्यात येणार आहे..
अशी माहितीही त्यांनी दिली..त्यानंतर..
आष्टी विधानसभा मतदारसंघांमधील आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचे किती ग्रामपंचायती मध्ये सरपंच निवडून आले आहेत ?
असे विचारले असता ते म्हणाले की,
लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त केले असून.. आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे असे सांगत
आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथे सरपंच संदीप खेडकर आणि चार सदस्य, धिरडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असली तरी सरपंच श्रीमती आशाबाई करडुळे आणि सदस्य
पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे सरपंच
सौ स्मिता रविंद्र केकाण, गांधनवाडी ग्रामपंचायत चे सरपंच पदी श्री अशोक यशवंत जेधे,
धनगर जवळका येथे सरपंच सौ सुरेखा अभय पवार,
रोहतवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ छाया पांडुरंग शिंदे, वडझरी येथे सरपंचपदी सौ अंजली संजय सानप, तांबा राजुरी येथे सरपंचपदी श्री. गणेश तांबे आणि चुंबळी येथे सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला तरी तीन ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे निवडून आलेले आहेत शिरूर कासार तालुक्यातील..
पिंपळनेर चे सरपंचपदी
श्री. मिठू जायभाये, उकिरडा चकला चे सरपंचपदी
श्री राजेंद्र पानसंबळ, तिंतरवणीचे सरपंचपदी
श्री उद्धव खेडकर तरडगव्हाण येथील सरपंच पदी सौ मंगल अंकुश चवरे घोगस पारगाव येथे तीन ग्रामपंचायत सदस्य, बोरगाव चकला येथे सरपंच श्री नवनाथ महादेव खेडकर हे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा आपण निवासस्थानी सत्कार केला असून उर्वरित सरपंच यांचा भेट भेटीसाठी आल्यानंतर सत्कार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले..
stay connected