पत्रकारांच्या जगण्यावर नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा 'फ्रेम'
नागराज मंजुळे हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते. नागराज मंजुळेंचा प्रत्येक सिनेमा पाहणं एक पर्वणी असते. फँड्री, सैराट अशा सिनेमांमधून नागराजने उत्कृष्ट काम केलंय. नागराजचे सिनेमे पाहणं एक पर्वणी असते. नागराज प्रत्येक सिनेमांमधून मनोरंजन करण्यासोबतच सामाजिक विषय मांडताना दिसतो. अशातच नागराजच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं नाव फ्रेम. नागराजचा आगामी सिनेमा फ्रेमनागराज मंजुळेचा आगामी सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं नाव आहे फ्रेम. फ्रेमचा टीझर नाळ 2 सोबत दाखवण्यात येतोय. फ्रेमच्या टीझरमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की एका बुलेटवर Press असं लिहीलं असतं. या बुलेटमधून नागराज मंजुळे उतरतात. त्यांच्यासमोर लोकांची गर्दी वेगाने पळत असते. नागराज त्या गर्दीचे त्यांच्या कॅमेरात फोटो काढतात.
नागराजच्या सिनेमात हा अभिनेता झळकणार हा अभिनेतानागराज मंजुळेंच्या आगामी फ्रेम सिनेमाचं दिग्दर्शन केलंय विक्रम पटवर्धन यांनी. या सिनेमात स्वतः नागराज मंजुळे प्रमुख भुमिकेत आहेत. ते या सिनेमात फोटोजर्नलिस्टची भुमिका साकारताना दिसणार आहेत. याशिवाय या सिनेमात नागराज मंजुळेंसोबत सध्या आघाडीचा अभिनेता झळकणार आहे तो म्हणजे अभिनेता अमेय वाघ. अमेय वाघची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळते. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीझरवरुन हा सिनेमा पत्रकारांच्या आयुष्यावर भाष्य करणार अशी शक्यता आहे.
stay connected