दौंड-मनमाड मार्गातील १४.०३ किमीच्या दुहेरीकरणाचा बेलवंडी-विसापूर विभाग दि. ०९/११/२०२३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाला.
श्री मनोज अरोरा आयुक्त रेल्वे सुरक्षा (सीआरएस) यांनी सुरक्षा तपासणीनंतर नव्याने उघडलेल्या दुहेरी मार्गाचे सुरक्षित प्रमाणपत्र दिले. श्री विवेक कुमार गुप्ता/मुख्य प्रशासकीय अधिकारी निर्माण, डीआरएम/सोलापूर श्री नीरज कुमार दोहरे हेही पाहणीवेळी उपस्थित होते.
१२३ kmph ने स्पिड ट्रायल करण्यात आले.
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात दि. २३ एप्रिल ते आजपर्यंत २०२३ पर्यंत ५ विभागांमध्ये १६१.८० किमी मल्टीट्रॅकिंग (नवीन लाइन/दुहेरी/३री/४थी मार्गिका) पूर्ण केली आहे.
• या वर्षात नवीन रू. ३८९० कोटी मार्गिका/दुप्पट/३री/४चौथी मार्गिका/गेज रूपांतरणासाठी नियोजिन केले.
• आजपर्यंतचा रू. २९९० कोटी खर्च झाला आहे.
-दौंड-मनमाड दुहेरीकरणाचा तपशील-
लांबी- २३६.६१ किमी
पूर्ण दुहेरीकरण- १३४.३१ किमी (५६.७६%)
किंमत- २०८१.२७ कोटी
आजपर्यंतचा खर्च- रु. १५७२.२८ कोटी
एकूण भौतिक प्रगती- ६७%
अ) पूर्ण दुहेरी - १३४.३१ किमी (५६.७६%)-
काष्टी-विसापुर
सारोळा-अकोळनेर
पढेगाव-पुणतांबा
कान्हेगाव-मनमाड
ब) पूर्णत्वाच्या जवळ विभाग-
(या आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता)- ५४.०४ किमी (२०.३९%)-
निंबलक-पढेगाव
क) प्रगतीपथावर- ५४.०४ किमी (२२.८५%)-
दौंड-काष्टी
विसापुर-सारोळा
अकोळनेर-निंबळक
पुणतांबा-कान्हेगाव
भूसंपादन आवश्यक- ६८.१६ हेक्टर
भूसंपादन पूर्ण झाले - १३.१४ हेक्टर (२०%)
भूसंपादन राहिले - ५५.०२ हेक्टर (८०%).
पूर्ण झालेल्या कामांचा तपशील-
भराव (अर्थवर्क)- ११६.८७/१६२.०४ लाख घनमीटर (७२%)
ब्लँकेटिंग- २.४/४.० कम (६२%)
प्रमुख पूल- ११/२८ (३९%)
किरकोळ पूल/पुलांखालील रस्ता- १००/११७ (८६%)
नवीन स्टेशन इमारती- ११/२१ (५२%)
ट्रॅक लिंकिंग- १५४/२९० ट्रॅक किमी (५३%)
ओएचई (ओव्हरहेड उपकरणे) फाउंडेशन- २४००/६००० (४०%)
ओएचई मास्ट इरेक्शन- २०००/४८०० (४२%)
ओएचई वायरिंग- १५०/२९० ट्रॅक किमी (५२%)
सिग्नलिंग नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग - ६/२२ स्टेशन्स (२७%)
सिग्नलिंग इनडोअर आणि आउटडोअर कामे- १६/३६ (४४%)
दौंड-मनमाड सेक्शन दुहेरीकरण पूर्ण केल्याने ट्रेनची गतिशीलता वाढण्यास मदत होईल आणि रेल्वे क्रॉसिंग खोळंबण्याची वेळ आणि सेक्शनची गर्दी कमी होईल.
------
stay connected