सलून क्षेत्रात कर्जतच्या संघटनेचा क्रांतिकारी निर्णय, परप्रांतीय आणि इतर समाजाला सलून व्यवसाय करण्यास मज्जाव...??

 सलून क्षेत्रात कर्जतच्या संघटनेचा
क्रांतिकारी निर्णय,
परप्रांतीय आणि इतर समाजाला  सलून व्यवसाय करण्यास मज्जाव...??



प्रतिनिधी : संजय पंडित


सलून व्यवसायात परप्रांतीय आणि इतर समाजातील लोकांचे अतिक्रमण हा अतिशय चिंतेचा विषय बनला असून शहरी भागासह हा प्रकार सर्रासपणे ग्रामीण भागातही बोकाळू लागला आहे.लोकशाही स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या संघटना आणि पदाधिकारी देखील हतबल झालेल्या पहावयास मिळत आहेत.

पण याला अपवाद ठरली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल नाभिक सामाजिक संघटना.

कर्जत शहरात देखील इतर शहरांप्रमाणे परप्रांतीय आणि इतर समाजातील लोकांनी सलूनचा व्यवसाय सुरू केला होता.यामुळे स्थानिक समाज बांधवांच्या मिळकतीत बराच फरक पडू लागला होता.परप्रांतीय आणि इतर समाजातील लोक कमी भावात सेवा देत होते.परिणामी स्थानिकांच्या व्यवसायावर याचा वाईट परिणाम होत होता. नेहमीचा ग्राहक देखील कमी भावामुळे त्यांच्याकडे वळू लागल्याने स्थानिक व्यवसायिकांमधे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.कित्तेक स्थानिकांनी धंद्या अभावी आपली पारंपरिक सलून दुकाने बंद करून इतर व्यवसाय सुरू केले होते.

या सर्व गंभीर परिणामांची दखल घेत कर्जत मधील आपल्या सामाजिक संघटनेने रणशिंग फुंकले आणि एक ऐतिहासिक ठराव पारीत केला.


त्यांच्या या क्रांतिकारी समाजहिताच्या निर्णयाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

हा धाडसी आणि प्रेरणादायी निर्णय संस्थेचे अध्यक्ष राकेश डगले यांच्या पुढाकारातून घेतला असून उपाध्यक्ष कृष्णा पवार,सचिव विशाल कोकरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी याला लागलीच मान्यता देऊन अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

संस्थेचे सलून दराबाबतचे सर्व नियम सर्व सलून व्यवसायिकांना बंधनकारक केले असून नियम मोडणाऱ्यावर संघटना नियमाप्रमाणे कारवाई करीत आहे.

*जर कर्जमधील संघटना हे करू शकते तर मग इतर शहरातील संघटना का करू शकत नाही..?*

मित्रानो आपल्या लोकशाहीत कुणालाही कोणताही व्यवसाय कुठंही करण्याचा अधिकार असला तरी.भूमी पुत्र आणि स्थानिक समाजाला कायद्याने पुरेसे संरक्षण आणि आरक्षण देखील देण्यात आलेले आहे.

सोबतच आम्हाला आमच्या हक्कासाठी स्थानिक संघटना असतात.

*गरज आहे फक्त संघटनेचे महत्व आणि पदाधिकाऱ्यांनी पदांची जवाबदारी समजून घेण्याची.*

संघटना,मग ती कोणतीही असो,

आमची सामाजिक संघटना असो,अथवा सलून संघटना असो.

संघटनेने समाज बांधवांच्या पाठी प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे.घटनेने संघटनेला बरेच अधिकार दिले आहेत.

*प्रत्येक संघटनेला आपल्या विभागात स्वतःचा अघोषित दरारा निर्माण करता आला पाहिजे.*

*विभागातील समाज बंधवाला आणि सलून व्यवसायिकाला संघटना म्हणजे मोठा आधार वाटायला हवा.*

त्याच प्रमाणे सलून व्यवसायिकांनी आणि समाज बांधवांनी देखील आपल्या विभागातील संघटनेचे महत्व ओळखून संघटनेच्या वाढीला हातभार लावणे गरजेचे आहे.फक्त गरजेपुरते संघटनेचा विचार न करता संघटनेच्या सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाची जवाबदारी ओळखून पदाला न्याय दिला पाहिजे.


बांधवांनो,

सलून व्यवसाय आमचा पारंपरिक व्यवसाय,आमच्या नसानसात भिनलेली अनमोल कला,

आज बलुतेदार नष्ट झाला तरी आमच्या समाजाने मोठ्या हिमतीने ही कला जोपासली आहे.

धार्मिक विधींसाठी आजही जर स्थानिकच लागतो तर मग तुमचा पारंपरिक व्यवसाय इतरांच्या हातात का जाऊ देता...?

कर्जतच्या संघटनेचा आदर्श घ्या,

मोठ्या शहरात जरी हे अशक्य असेल तरी जिल्हे,तालुके आणि मोठमोठ्या गावांमधे अतीक्रमनाची ही कीड नक्कीच रोखता येईल.

कठीण आणि अशक्य काहीच नाही.गरज आहे फक्त मानसिकता बदलण्याची.

ठाम निर्धार करण्याची.

संघटनेत खुप ताकद असते हे वेळीच समजून घ्या.

*आमचा व्यवसाय जर अभिमानाने आमच्याच जवळ टिकवून ठेवायचा असेल तर संघटित रहा एकसंघ होऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला व्यवसाय अद्यावत करा....*


*🤝आमची एकता हीच आमची ताकद 🤝*


       *🚩नाभिक एकता जिंदाबाद🚩*


धन्यवाद

🙏🙏

आपलाच,

*संजय पंडित*



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.