अध्यापक महाविद्यालय आष्टी येथे आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी..
आज आष्टी तालुक्यातील अध्यापक स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्राचार्य बनाळे सर होते तर प्रमुख पाहुणे प्रा.जाधव सर होते ,सुत्रचालन सौरभ वाळके यांनी केले प्रथम जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करूनअभिवादन करण्यात आले, व नंतर समीर शेख यांनी प्रस्तावना केली,या कार्यक्रमाप्रसंगी , डॉ. प्रा. बनाळे सर, डॉ. झाकडे मॅडम, प्रा.केदार सर, प्रा.जाधव सर या प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांमध्ये गायकवाड,बेद्रे,वाळके, बांगर यांनी मनोगत व्यक्त केले व निखिल खेडकर यांनी आभार मानले त्याचबरोबर महाविद्यालयातील व्दितीय वर्षाचा विदयार्थी समीर शेख यांना यशवंत रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्याचा महाविद्यालय मार्फत सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित प्राचार्य डॉ बनाळे सर, प्रा केदार सर, प्रा जाधव सर, प्रा जफर सर , प्रा झाकडे मॅडम, बोडखे सर, आडकर सर, मिसाळ सर आणि सर्व विदयार्थी उपस्थित होते
stay connected