*"पद्म विभूषण जानकिदेवी बजाज पुरस्काराने केजच्या मनिषाताई घुले सन्मानित."*

 *"पद्म विभूषण जानकिदेवी बजाज पुरस्काराने केजच्या मनिषाताई घुले सन्मानित."*



केज (प्रतिनिधी)

दि ११डिसेंबर २०२३ रोजी, देशपातळीवरती *'ग्रामीण महिला व्यवसाय व उद्योजकता विकास'* संदर्भात दिला जाणारा *२९ वा ' जानकिदेवी बजाज पुरस्कार* यावर्षी *नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संस्थापक सचिव श्रीमती मनिषा घुले* ताईंना काल मुंबई येथील *आयएमसी लेडीज विंगच्या* कार्यालयात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड *नायका* च्या फाऊंडर व सीईओ *श्रीमती फाल्गुनी नायर* यांच्या हस्ते व  बजाज कुटुंबीय,प्रसिद्ध उद्योगपती समूहातील सहकारी पदाधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थतीमध्ये देण्यात आला.

        यावेळी मंचावराती आयएमसी लेडीज विंग च्या *अध्यक्षा श्रीमती रोमा सिंघानिया* यांनी पुरस्काराची प्रस्तावना केली,श्रीमती *राधिका नाथ* यांनी आयएमसीची भूमिका मांडली श्रीमती मनीषा घुले ताईंनी आपल्या सामाजिक जीवनाचा प्रवास आणि भूमिका स्पष्ट केली प्रमुख पाहुण्या श्रीमती फाल्गुनी नायर यांनी आपले मत व्यक्त केले श्रीमती प्रियदर्शनी कनोडिया यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्षा श्रीमती अमरीता सोमय्या यांनी समस्त उपस्थितांचे विशेष आभार मानले,

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बजाज इलेक्ट्रिकचे मालक *श्री शेखर बजाज, निर्मल बजाज पूजा बजाज,सुश्री अनार शाह,श्रीमती ज्योती दोशी,डॉ.स्मिता दांडेकर,श्रीमती शिला कृपलानी,श्रीमती आशा जोशी,श्रीमती दीपा सोमण,श्री.दीपक सतावलेकर,श्रीमती मृणालिनी खेर,श्री प्रदीप शाह श्रीमती रूप शाह व सुश्री सोम्या रॉय आदी उपस्थित होते*.

         यावेळी नायका ब्रँड च्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी मनिषा घुले ताईंच्या कार्याला समाजातील महिलांसाठी एक प्रेरणदायी कार्य म्हणून संबोधित केले नायका ब्रँड चा सुरुवातीचा प्रवास आणि मनिषा ताई करत नवचेतनाचा प्रवास हा जवळपास सारखाच आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात नवचेतना ग्रामीण महिलांच्या उद्योगामध्ये एक विशेष प्रगतीवरती पोहचेल असे भाकीत केले. आपण ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचे विशेष कार्य करत आहात त्याचा सर्वांना अभिमान आहे असे आदरपूर्वक मत त्यांनी यावेळी बोलतांना मांडले 

     मनिषा घुले ताईंनी आपला संघर्षमय जीवनप्रवास सर्वांसमोर मांडून आज कशा पद्धतीने त्या एक निराधार महिला ते ५०,००० महिलांच्या ताई बनल्या आहेत याची त्यांनी मांडणी केली. 

       भविष्यात ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणाऱ्या विविध योजनांची त्यांनी मांडणी केली त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले व अशा पुरस्कारांनी सन्मानित केल्याने ग्रामीण महिलांचे, कार्यकर्त्यांचे मनोबल अधिक वाढून ते आणखीन जोमाने,ताकतीने महिला सक्षमीरणासाठी तयार होतील असा विश्वास त्यांनी दिला व सर्वांचे विशेष आभार मानले. 

       या पुरस्कार सोहळ्यासाठी  जानकीदेवी बजाज महिला महावि्यालयाच्या मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थिनी तसेच प्रमुख मीडिया समूहाचे प्रमुख व सुरुवातीपासून त्यांच्या सोबत खंबीरपणे साथ देणारे कुटुंबातील सदस्य.संस्थेचे संचालक महादेव जोगदंड, संस्थेचे सीईओ श्री.अनिल लष्कर, महिला कार्यकर्त्या कौशल्या थोरात,निर्मला जाधव,लक्ष्मी बोरा,वंदना कांबळे,रजनी काकडे,शिवाजी केंद्रे ,विजय गोरे व दत्ता घुले आवर्जून उपस्थिती होतें.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.