🌹✨ *कल्याण नगरीत पार पडले भव्य कवी संमेलन!!!*🌹✨
आम्रपाली धेंडे
दि. ०८.०१.२०२३. रविवार रोजी कल्याण येथे मनस्पर्शी साहित्य परिवाराचे पहिले भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन दिमाखात पार पडले.
सकाळी ९ ते ४ या वेळेत हे संमेलन श्री सिद्धिविनायक गार्डन हॉल भोईरवाडी, कल्याण (पश्चिम) येथे संपन्न झाले.मनस्पर्शी साहित्य परिवाराचे व्यवस्थापक- कवी. निखिल प्रमोद कोलते यांच्या प्रिय भगिनी व मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या अध्यक्षा- मा. मानसी ताई पंडित तसेच समूहाचे मार्गदर्शक, सुप्रसिद्ध लेखक आमचे गुरुवर्य प्रा. विजय काकडे सर या दोन्ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे भव्य काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.संमेलनाची बहारदार सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सुरेल असे स्वागत गीत गाऊन मा.मानसी ताई पंडित यांनी केली,त्यांना त्यांचा भाऊ मा. कु.मंदार पंडित ह्यांची तबल्यावर साथ लाभली.हे स्वागत गीत मा.डॉ.निलांबरी गानू लिखित,मा.प्रा.विजय काकडे सवरबद्धित होते.
संमेलनाचे उद्घाटन- मा. दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध कवियत्री- प्रा. मानसी जोशी यांची स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेली उपस्थिती नवोदित कवी/कवयित्रींसाठी खरोखरच मोलाची ठरली. त्याच बरोबर प्रमुख वक्ते म्हणून, श्री. आनंद लेले यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून,मा. कल्पना गवरे, मा. अस्मिता पंडित यांनी स्थान भूषवले. कल्पना गवरे,अस्मिता पंडित यांच्या सुंदर भाषणाने सभागृह प्रफुल्लित झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध कवियत्री- प्रा. प्रतिभा ताई सराफ यांचे नवोदित कवींना मार्गदर्शन तसेच संमेलनाचे आयोजना संदर्भात सर्व कार्यरिणीला दिलेला मोलाचा सल्ला आणि त्यांनी काव्यप्रकाराचे केलेले विस्तृत विश्लेषण आणि त्यांच्या कवितांचे सादरीकरण संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्याचबरोबर ह्या संमेलनाला माजी आमदार.मा. श्री.नरेंद्र पवार(भारतीय जनता पक्ष) यांची देखील उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समूहाच्या अध्यक्षा. मा. मानसी ताई पंडित, व समूहाचे व्यवस्थापक. मा. निखिल कोलते यांनी केले. कवयित्री- सौ. सोनाली जगताप, कवयित्री- सौ. मधुरा कर्वे, कवयित्री- सौ. संपदा देशपांडे, कवयित्री- मा. जयश्री चौधरी, कवी. प्रा. विजय काकडे यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी कार्यकारणी सदस्य म्हणून आपले अनमोल योगदान दिले. एकूण ३५ निमंत्रित कवी/कवयित्रींनी या संमेलनात बहारदार काव्य सादरीकरण करून संमेलनाला चार चांद लावले. प्रशासकीय मंडळातील, अध्यक्षा. मानसी ताई पंडित, उपाध्यक्षा. जयश्री ताई शेळके, व्यवस्थापक- निखिल प्रमोद कोलते, सह संचालक व मार्गदर्शक. राजेश नागुलवार सर यांनी संमेलनाच्या आयोजनापासून संमेलन यशस्वी होण्यापर्यंत अगदी सुरुवातीपासून अतिशय मेहनत घेऊन कष्टाने आणि आपल्या अथक परिश्रमाने संमेलनाचे आयोजनापासून संमेलन यशस्वी होण्यापर्यंत कार्यशील राहून यथायोग्य कार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तन्वी हर्बल्स कंपनीच्या अध्यक्षा.डॉ. मानसी मेहेंदळे, आम्ही कल्याणकर फेसबुक समाजाचे सर्वेसर्वा- स्वप्नील कांबळी, कल्याण मधील सुप्रसिद्ध बिल्डर, श्री. उमेश बोरगावकर, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. नरेंद्र पवार, कल्पना गवरे, राधिका भांडारकर, मानसी जोशी, डॉ संजय शाह, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याचबरोबर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित विविध विशेष उपक्रमातील विजेते, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांना संमेलनात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मनस्पर्शी साहित्य परिवार हा साहित्य सेवेकरिता समर्पित आहे. या साहित्य सेवेला पूर्णत्वास नेण्यास कुटुंबाची जोडगोळी महत्वाची ठरली. श्री प्रमोद कोलते, सौ. रजनी प्र. कोलते, श्री.संतोष पंडित, सौ. मनाली सं. पंडित,कु.मंदार संतोष पंडित,श्री.भागवत शेळके, सौ.सीमा शेळके व सौ.मंजुषा राजेश नागुलवार,कु.आश्रिया नागुलवार ह्या सर्वांचे देखील अमूल्य योगदान लाभले! साहित्यातील गद्य व पद्य विभागातील सर्वच साहित्य कृतींना मान देऊन विविध साहित्यिक उपक्रम राबवणे हा मनस्पर्शी मुख्य हेतू आहे, आणि म्हणूनच यापुढे देखील असेच विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम मनस्पर्शी साहित्य परिवार साहित्यिकांसाठी आयोजित करत राहील असे आश्वासन, अध्यक्षा .मा. मानसी ताई पंडित, उपाध्यक्षा.मा. जयश्री ताई शेळके, व्यवस्थापक- कु. निखिल प्रमोद कोलते, व समूह मार्गदर्शक तसेच सह संचालक- मा. राजेश नागुलवार यांनी दिले आहे!!
stay connected