गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा

 गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा





कडा - दि. 12 जानेवारी 2023 रोजी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या गांधी महाविद्यालयाच्या वतीने इंग्रजी विभाग, आजीवन शिक्षण व विस्तार विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राठी एन. एस. हे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सज्जन गायकवाड, उपप्राचार्य डॉ. भंडारी जे. एम., प्रा. गवळी एन.टी. उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. सज्जन गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन कणखर ठेवून आपले ध्येय गाठले पाहिजे. राजमाता जिजाऊच्या विचारांची मूल्य जपली पाहिजेत. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राठी एन. एस. म्हणाले की, विद्यार्थ्यांनी श्रद्धा व त्याग अंगी बाळगून आदर्श युवक बनले पाहिजे तसेच राजमाता जिजाऊच्या संस्काराची शिदोरी सतत अंगी बाळगली पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल गर्जे यांनी तर आभार प्रा. डॉ. राजकुमार थोरवे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.