-राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2023
आम्रपाली धेंडे
राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे ,स्वराज्य जननी,स्वराज्याच्या संस्थापिका,ऊर्जेचे स्रोत,प्रेरणेचा मंत्र,माया,ममता,शौर्य,धैर्य आणि संस्कार यांचा सुरेख मेळ...........
छत्रपती शिवाजी महाराज सहकारी मंडळी बँक लि.बडोदा,गुजरात व बँकेचे चेअरमन गौरवजी पवळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून मिरवणुकीची सुरवात करण्यात आली,ओपन जीप मधून शोभायात्रेने कार्यक्रमस्थळी सर्व वंशज यांचे आगमन झाले .या भव्य दिव्य अशा समारंभात तंजावरचे राजे मा.बाबाजीराजे भोसले तसेच फलटणचे शिवरूपराजे नाईक निंबाळकर खर्डेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले......
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर असणारे सरदार ,मावळे यांच्या वंशजांचा हा सन्मान सोहळा होता.छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे सवंगडी ते सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा सन्मान होताना सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची वंशज म्हणून डॉ शीतलताई शिवराज मालुसरे हे नाव पुकारले आणि ऊर अभिमानाने भरून आला..डोळ्याच्या कडा पाणावल्या....हा पुरस्कार म्हणजे एक जबाबदारी याची जाणीव ठेवून हा पुरस्कार मी स्वीकारला.......
या बरोबरच श्री समीर प्रकाश इंदलकर ,श्री संतोष इंदलकर,श्री राजाभाऊ पासलकर, सौ.वैजयंती ताई पासलकर,श्री अविनाश पासलकर ,श्री रवींद्र कंक,श्री प्रथमेश बांदल,श्री आदित्य बांदल,श्रीजयाजी मोहीते,श्रीसयाजी गुजर,डॉ.सुवर्णाताई निंबाळकर,श्रीआंनद काशीद,श्रीनिलेश देशपांडे,श्री संदेश देशपांडे ,श्री संदिप पोतनीस,श्रीअमरसिंह जाधवराव,श्री विनायक केसरकर,श्री सिदार्थ कंक,
श्री दादाराजे नाईकजाधव,श्री नील पंडित यांना सन्मानित करण्यात आले या वेळी गुजरातचे माजी मंत्री ञिवेदीसाहेब व हुतात्मा भगतसिंग यांचे वंशज उपस्थित होते.
कोल्हापूरचे भटकंती हायकर्स समूहाचे मर्दानी खेळ आणि ढोल ताशा पथक यांनी विविध आकर्षक मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक केले.
गौरव जी आणि त्यांचे सहकारी यांनी उत्तम नियोजन केले होते..तर प्रवासाचे नियोजन भारतजी सासे आणि शैलेश जी यांनी केले.
stay connected