छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

 छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा




आष्टी प्रतिनिधी

 दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी पर्यावरणाचे महत्व तसेच पर्यावरणाचे संरक्षण याची समाजबांधवांमध्ये जनजागृती केली जाते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृषी महाविद्यालय आष्टी, तंत्रज्ञान पदविका महाविद्यालय आष्टी,  तसेच महाराष्ट्र वन विभाग कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद शैक्षणिक संकुल, आष्टी येथे वृक्षारोपण व पर्यावरणाविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून भाषण करताना संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. डी.बी.राऊत यांनी उपस्थितांना पर्यावरणाच्या संरक्षण बद्दल मार्गदर्शन केले. श्री अमोल घोडके, वनपाल यांनी वृक्षारोपणाचे पर्यावरण संरक्षणामध्ये असणारे महत्त्व विशाद केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीराम आरसूळ यांनी औद्योगिकरणामुळे होणाऱ्या वृक्षतोड, सांडपाणी यामुळे होणाऱ्या पर्यावरणाचे नुकसान व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय योजना बाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रांगणावर उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी. राऊत, कृषी महाविद्यालय प्राचार्य श्री एस.आर. आरसूळ, तंत्रज्ञान पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय बोडके, वन विभाग आष्टी येथील वनपाल श्री‌. अमोल  घोडके श्री. बबन येवले, वनरक्षक श्रीमती विजया शिंदे श्री. बाबासाहेब शिंदे, कार्यालय सहाय्यक नदीम बेग महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाधव यांनी केले तसेच श्री. संदीप धोंडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार  मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.