मुंबई - पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात...,?

 मुंबई - पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात...,?



प्रतिनिधी : संजय पंडित


दि ४ मुंबई : महाराष्ट्राला पहिली 'वंदे भारत ट्रेन' लवकरच मिळणार आहे. याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना होणार आहे. मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात होणार आहे.


१५ ऑगस्टपर्यंत २ गाड्या महाराष्ट्राला मिळू शकतात. सध्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास अडीच तासावर येणार आहे, म्हणजेच प्रवाशांचा एक तास वाचणार आहे.


भारतीय रेल्वेने निविदा जारी करून लवकरच २०० वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. या निविदेत ट्रेनचे डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्सचे नियोजनही सांगण्यात आले आहे.


रेल्वेने निविदा काढली असून लवकरच ट्रेनचे अपग्रेडेशन केले जाईल असे सांगितले आहे. सध्या या ट्रेनच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत केले जात आहे. यानंतर हे काम चेन्नईतही केले जात आहे.


ही ट्रेन आता मध्यम आणि लांब पल्ल्यांसाठी चालवली जाईल, असे रेल्वेचे नियोजन आहे. ट्रेनमध्ये अप स्लीपर कोच देखील असतील, जेणेकरून लोकांना लांबचा प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.


रेल्वेने या संदर्भात एक निविदा जारी केली आहे, ज्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२२ आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड एसी आणि थर्ड एसी सुविधा उपलब्ध असतील. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे बसवण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.