साउथ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'विठ्ठल' लघुचित्रपटाला पुरस्कार...!

 साउथ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'विठ्ठल' लघुचित्रपटाला पुरस्कार...! 



कडा: प्रतिनिधी. 

साउथ इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये शुभम जैन दिग्दर्शित 'विठ्ठल' या लघुचित्रपटाने ' बेस्ट ॲस्पायरिंग फिल्ममेकर' हा पुरस्कार पटकावला आहे.

साउथ इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून अनेक लघुचित्रपट आणि माहितीपटांनी सहभाग नोंदवला होता. 

'विठ्ठल' या लघुचित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक - लेखक शुभम जैन यांनी कोरोना टाळेबंदीच्या काळात माणूसकी धर्म जपत जीवाची काळजी न करता इतरांना अन्न पोहोचविणाऱ्या सेवेकऱ्यांना समर्पित या लघुचित्रपटाची निर्मिती केली. 

झेड प्लस एन्टरटेन्मेंट, पुणे प्रस्तुत आणि सुनील डमरे निर्मित 'विठ्ठल' या लघुचित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शुभम जैन यांनी केले असून, सह-दिग्दर्शक म्हणून गणेश वाळुंज यांनी काम पाहिले. तसेच छायाचित्रण शुभम निंबाळकर आणि सचिन गायगोवे, संकलन सुनील डमरे , कला दिग्दर्शक आयाज शेख, तर कार्यकारी निर्माता म्हणून अंकुश कोरे यांनी काम पाहिले. तसेच विठ्ठल या लघुचित्रपटाला झेब्रा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, स्टार स्टुडिओ फिल्म फेस्टिवल, गाजियाबाद आदी फिल्म फेस्टिवलमध्ये देखील नामांकन मिळाले आहेत.  

नुकत्याच मिळालेल्या पुरस्कारासाठी 'विठ्ठल' या लघुचित्रपटाच्या संपूर्ण टीमचे सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.

--------%%-------




कोरोना महामारी काळात संपूर्ण जग स्तब्ध असताना काही हात आपल्या जिवाची पर्वा न करता इतरांसाठी राबत होते. अशा राबणाऱ्या हातांचे ऋण व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून आम्ही केला आहे. 

- शुभम जैन (दिग्दर्शक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.