मेहकरी नदीवरील पुलामुळे परिसरातील गावे राज्य रस्त्याशी जोडले जाणार ***************************** दर्जेदार आणि वेळेपूर्वी काम पूर्ण करावे आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन

 मेहकरी नदीवरील पुलामुळे परिसरातील गावे राज्य रस्त्याशी जोडले जाणार 

*****************************

दर्जेदार आणि वेळेपूर्वी काम पूर्ण करावे

आ.सुरेश धस यांचे प्रतिपादन 






*******************************

धानोरा (प्रतिनिधी)

मेहकरी नदीवरील पुलाचे कामासाठी गेली पंधरा ते वीस वर्षेपासून प्रयत्न केले आहेत.विद्यार्थ्यांचे आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल पाहून काळजात टोचणी व्हायची आता या ठिकाणी भव्यपुलाची बांधकाम होणार आहे. या परिसरातील गावांना राज्य रस्त्याची जोडले जाणार आहे. तसेच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना कांदा व इतर शेती माल कडा बाजारपेठेसाठी घेऊन जाण्याकरिता मोठी सोय निर्माण होणार आहे. बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करून घ्यावे आणि एक नवा आदर्श निर्माण करावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.पिंपळगाव दाणी या गावाच्या दरम्यान मेहेकरी नदीवरील पुलाचे बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

 आ.धस पुढे म्हणाले,पिंपळगाव दाणी व मेहकरी आणि पुढच्या या मार्गावरील सर्व गावकऱ्यांची खूप वर्षापासून मागणी होती परिसरातील काहीही करा एवढ मेहकरी नदीच्या पुलाचे काम करा.या मागणीवर वेळोवेळी पाठपुरावा करून यश मिळाले असून 

नाबार्ड टप्पा-२५ अंतर्गत १९१.६० लक्ष निधीचा साडेसात फूट रुंद असा भव्य पुल होणार असून मे महिन्यापर्यत पूर्ण होणार असल्याने परिसरामधील शेतकऱ्यांचा ऊस गाळपाचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. परिसरातील अनेक साखर कारखान्यांकडे आपण प्रयत्नपूर्वक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाचे व्यवस्था करण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न करून हवालदिल शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे असे सांगून कडा बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव दिला जात आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता कडा बाजार समिती मध्येच कांदा विक्री करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रास्ताविकामध्ये पिंपळगाव दाणीचे सरपंचपती शरद कवडे म्हणाले, आ.धस आपल्यामुळे मेहेकरी व पिपळगाव दाणी गावांचा चाळीस वर्षपासूनचा प्रलंबित प्रश्न आपल्या पाठपुरावाने पूर्णत्वास जात असल्याने आमचे स्वप्न साकार झाले आहे.याबद्दल आ. धस ययांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले. यावेळी अभियंता सौदागर,पंडित पोकळे,अतुल जाधव, ह.भ.प.गोविंद महाराज जगताप यांची भाषणे झाली यावेळी उपअभियंता सौदागर ,शाखा अभियंता बाराडे ,कांबळे ,ह.भ.प.गोविंद महाराज जगताप,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे जि.प.सदस्य अमर निंबाळकर,विनोद रोडे,सरपंचपती शरद कवडे,मुकींद जगताप,नवनाथ जगताप,भिमराव माळशिखरे,राजेंद्र गावडे,पाटील जगताप,कारभारी गव्हाणे,कृष्णा काकडे,दत्तोबा घोडके,बाळासाहेब थोरवे,अशोक परकाळे,भाऊसाहेब झांजे,सीताराम झांजे,सुभाष झांजे,अतुल जाधव,अनिल गलांडे,रमेश ढगे,अतुल खराडे,पंडीत पोकळे,बाळासाहेब साके,महादेव साके,खाजा शेख,संतोष खोटे,सखाराम सरोदे,ईश्वर साके यांच्यासह पिंपळगाव दाणी,मेहकरी,वाहिरा,पारोडी,बोरोडी सह आदी ग्रामस्थ उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जगताप सर यांनी केले तर आभार संदीप खराडे सर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.