चिखली येथील ज्योतिबा देवस्थानाच्या सुशोभीकरण पेविंग ब्लॉगच्या बसवण्याचा कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते देविदास आबा धस यांच्या हस्ते संपन्न.

 चिखली येथील ज्योतिबा देवस्थानाच्या सुशोभीकरण पेविंग ब्लॉगच्या बसवण्याचा कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते देविदास आबा धस यांच्या हस्ते संपन्न.



आष्टी प्रतिनिधी ----आष्टी तालुक्यातील चिखली गावामध्ये निसर्गाच्या सानिध्यात तिन्ही गावाच्या शिवा वर वसलेल्या ज्योतिबा देवस्थान मंदिराच्या परिसरामध्ये पेविंग ब्लॉक व सुशोभीकरणासाठी आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप यांनी आपल्या या निधीतून पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी 3 लक्ष रुपये निधी दिला आहे चिखली ग्रामपंचायत निधी देखील या मंदिराच्या कामाकरिता एक लाख 50 हजार रुपये निधी दिला असल्याचेही आबांनी सांगितले. या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते देविदास आबा धस यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी जि प सदस्य अमर निंबाळकर सभापती बद्रीनाथ जगताप महादेव नाना शिंदे उपसरपंच अमोल शिंदे गणेश शिंदे आदी उपस्थित होते यावेळी देविदास धस म्हणाले की हे ज्योतिबा मंदिर चिखली मंगरूळ खानापूर या तीन गावाच्या शिवा वर वसलेले आहे या मंदिराचे ठिकाण पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असल्याने या मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रसन्नता जाणवून येते त्यामुळे या मंदिराचा विकास तर होणारच आहे तरीदेखील गावकऱ्यांनी आपल्या गाव वर्गणी तीन जमलेला निधी देखील या मंदिरासाठी खर्च करावा या मंदिराला या अगोदर त्यावेळचे तत्कालीन आमदार भीमराव धोंडे यांनी सभामंडपात करता 5 लक्ष निधी दिला होता.या निधीतुन आता त्या ठिकाणी सभामंडप  उभारण्यात आला आहे सभामंडप मध्ये फरची बसवणे देखील गरजेचे आहे फरशी करिता जि प सदस्य अमर निंबाळकर यांनी आपण या सभामंडपामध्ये फरशी बसून देऊ असा गावकऱ्यांना शब्द दिला. यावेळी आष्टीचे सिमेंट लोखंड व्यापारी दिलीप शेठ मेहेर,यांनी या मंदिर बांधकामासाठी 50 बॅग सिमेंट देणगी देण्याचे जाहीर केले. यावेळी अंगत शिंदे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा मंदिर परिसरात सत्कार केला कार्यक्रमाच्या वेळी तिन्ही गावातील भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी वाल्मीक तोडकर शिवाजी आवारे दत्ता पाटील कोकणेचेअरमन प्रकाश कोकणे , संभाजी कोकणे..आदीसह गावकरी उपस्थित होते . ह भ प शिवाजी कोकणे महाराजांनी या मंदिराच्या प्रत्येक कामासाठी मोठे योगदान दिले आहे याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.