*केज तालुक्यातून एकाचे अपहरण, पोलीसात गुन्हा दाखल.*

 *केज तालुक्यातून एकाचे अपहरण, पोलीसात गुन्हा दाखल.*



केज तालुका (प्रतिनिधी) ऊस तोडणी साठी पाच लाख रुपये घेऊन मजूर न पाठवल्यामुळे केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत, जातिवाचक शिवीगाळ करून त्याचे अपहरण केले आहे. या प्रकरणी अद्याप व्यक्तींच्या पत्नीच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध अपहरण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या दरम्यान युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील ढाकेफळ तालुका केज येथे उदय पाटील, स्वप्नील पाटील आणि त्यांच्या सोबतचे इतर दोघे यांनी पांडुरंग घाडगे यांना त्यांचे ऊसतोडणीसाठी पाच लाख रुपये घेऊन ऊसतोडणीसाठी मजूर का पाठवले नाही असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पैसे का दिले नाही म्हणून गच्ची ला पकडून खाली पाडले स्वप्नील पाटील यांनी जातिवाचक बोलून असलीस भाषेत शिवीगाळ केली आणि पांडुरंग घाडगे यांना त्यांच्या गाडीत बसवून अपहरण केले तसेच जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत सोडणार नाही अशी, धमकी दिली दरम्यान याप्रकरणी पाच लाख रुपये साठी अपहरण करण्यात आलेले पांडुरंग घाडगे यांच्या पत्नी सौ .मैणाबाई घाडगे हिने दिनांक २९ जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तक्रार नोंदवून घेतली आहे या प्रकरणी उदय पाटील, स्वप्नील पाटील, दोघे राहणार कावणे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आणि इतर दोघे अशा चार जणांविरुद्ध गु.र.नं २१/२०२२ भा द वि ३६५,३२३,५०४, ५०६, ३४,आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३१ आर एस नुसार अपहरण मारहाण करून जीवे मारण्याची धमकी व अॅट्रासिटी या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक आयपीएस अधिकारी पंकज कुमावत हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.