पाटोदा बाह्यस्रोत वीज तांत्रिक युनियनची कार्यकारणी जाहीर

 पाटोदा बाह्यस्रोत वीज तांत्रिक युनियनची कार्यकारणी जाहीर.



 पाटोदा  -   तालुक्यातील वीज  क्षेत्रातील  बाह्यस्रोत कामगारांच्या असणाऱ्या विविध  समस्या सोडवण्यासाठी, तसेच  वेळप्रसंगी अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यासाठी,आपण सर्वांनी  युनियनच्या माध्यमातून संघटित होत, एकत्र आलं पाहिजे, अशा मुख्य उद्देशाने, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.जहिरोद्दीन साहेब व राज्य सचिव भाऊसाहेब भाकरे यांच्या नेतृत्वाखाली व राज्य संघटन सचिव उदय मदुरे , जिल्हा कार्याध्यक्ष नितीन खिळे , मार्गदर्शक भाऊसाहेब निंबाळकर , सर्कल अध्यक्ष विकास शिंदे , जिल्हा अध्यक्ष प्रशांत पोकळे , सचिव सुनिल वाघमारे , उपाध्यक्ष विठ्ठल शेंबडे , संघटक शाकेर भाई यांच्या सूचनेनुसार काल  नुकतीच  पाटोदा येथे जिल्हा अध्यक्ष किशोर सापते, उपाध्यक्ष, राजेंद्र डांभे, सचिव बशीद सय्यद,यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटोदा  बैठक संपन्न झाली.

     त्यात,महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक  बाह्यस्रोत कामगार युनियनच्या पाटोदा  तालुध्यक्षपदी भागवत बांगर यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष कोठेकर, सचिवपदी,कृष्णा नागरगोजे,यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.  त्यासोबत. कार्यकारणीत कार्यध्यक्ष दासू वीर, मुख्य सल्लागार छगन पाचपुते,सल्लागार,अमोल नागरगोजे,कोषाध्यक्ष श्रीकृष्ण शेटे, सहसचिव बाजीराव डोके,व महिला प्रतिनिधी,म्हूणन पल्लवी शेटे  यांच्याही  समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन थोरात यांनी दिली आहे.

     उत्तम संघटन कौशल्य,  आणि दुसऱ्यासाठी काम करण्याची उमेद  असणारे  भागवत बांगर हे  तालुक्यातील  कामगारांना एकजुठ करत,न्याय मिळवून देतील व , संकट प्रसंगी सर्वांच्या पाठीशी ठामपणे  उभे राहण्याचे काम करतील असा विश्वास यावेळी अमृत आजबे यांनी बोलताना व्यक्त केला.

     या बैठकीला, प्रमुख पाव्हुणे म्हणून संघटनेचे मार्गदर्शक, पदाधिकारी ,  सुनील वाघमारे, अमृतराजे आजबे, शिवाजी गोरे, चंद्रकांत कराडकर, लाईनमन  खेडकर, पतसंस्था सचिव जाधव मनोज निंबाळकर आदी मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते .यावेळी पाटोदा  कार्यकारणीतील नवनियुक्त  पदाधिकाऱ्यांना  सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.