महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषि जागरुगता व कृषि आद्यौगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१ - २२ अंतर्गत सद्गुरू कृषी महाविद्यालय , मिरजगाव येथे ऑनलाईन शेतकरी मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

 ऑनलाईन कार्यशाळा संपन्न 


कुर्डुवाडी / प्रतिनिधी

     


महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषि जागरुगता व कृषि आद्यौगिक  कार्यानुभव कार्यक्रम सन २०२१ - २२   अंतर्गत  सद्गुरू कृषी महाविद्यालय , मिरजगाव येथे ऑनलाईन शेतकरी मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन सदगुरु कृषी महाविद्यालय मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनी कु.गायत्री गायकवाड   , कु .निकिता शिंदे ,कु. स्वरांजली आतकर व कु. भाग्यश्री चव्हाण या कृषिकन्यांनी केले होते. 

या कार्यक्रमासाठी नांदवळ गावातील प्रमुख अतिथी श्री विशाल रासकर सर(Bsc.  Horticulture, MBA Agri-Business (NIAM)  प्रगत शेतकरी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या चर्चासत्रामध्ये  फळबागांची कलम निवडताना घ्यावयाची काळजी आणि नवीन बागेचे नियोजन या विषयावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले . 

या कार्यक्रमात श्री विशाल रासकर यांनी फळपिकांमध्ये महाराष्ट्राचे स्थान ,फळपिक लागवड पूर्वनियोजन , नर्सेरीचे नियोजन, कलमांची प्रकार ,लागवड करताना घ्यावयाची काळजी  व फळबाग लागवड अनुदान योजना यांबद्दल मुबलक माहिती दिली.

तसेच त्यांनी आंबा ,डाळिंब , द्राक्षे , केळी या फळपिकांवर उपस्थित केलेल्या  शेतकऱ्यांच्या शंकांचे ही उत्तमरीत्या निवारण केले. 

                 या कार्यक्रमासाठी सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव चे प्राचार्य डॉ रामदास बिटे सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कर्यक्रमासाठी प्रा. सौ स्वाती जगदाळे मॅडम , प्रा. केदार स्वामी सर व प्रा. श्रीरंग टेमक सर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सुद्धा उपस्थित होते.

या कार्यक्रमात सातारा, सोलापूर , पुणे या जिल्हातील विविध शेतकरी बांधव , कृषिकन्या , कृषिदूत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन शेतकरी मेळावा संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.