दिनांक 24/8/2021 रोजी पहाटे 3/00 वा कर्जत पोलीस स्टेशन हादित होत असलेल्या घरफोडी चोरी करणारे आरोपी पकडन्यासाठी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांनी पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले, कोम्बिंग करता नेमलेले पथकातील अधिकारी कर्मचारी याना Mh 16 CL 1069 मोटरसायकलसह दोन इसम मिळून आले. सदरचे इसम कर्जत पोलिस स्टेशन च्या रेकॉर्डवरील सराईत घरफोडी चोरी करणारे आरोपी असल्याचे लक्षात आले. त्यांची नावे 1) अक्षय देविदास भोसले वय २५ वर्ष रा गांधीनगर झोपडपट्टी तालुका कर्जत,2) मुक्या ऊर्फ मुकेश पितांबर या शिंदे वय 22 वर्षे राहणार नांदगाव तालुका कर्जत मूळ राहणार सातारा त्यांची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यात घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य लोखंडी कटावणी , पक्कड दोन धारदार चाकू सदर साधने जवळ बाळगणे बाबत त्यांना विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्यावर नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला चोरी घरफोडी जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हे कोठेतरी जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने चेहऱ्यास मास्क लावून झाकून लोखंडी कटावणी, पक्कड, दोन धारदार चाकू हे कब्जात बाळगून सूर्यास्त सूर्योदय दरम्यान जात असल्याचे मिळून आले. त्यावरून त्यांच्याविरुद्ध कर्जत स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ,त्यांना माननीय न्यायालयात समक्ष हजर केले असता न्यायालयाने सहा दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक उद्धव दिंडे हे करीत आहेत. सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस अंमलदार, अंकुश ढवळे पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, राणी व्यवहारे यांनी केली आहे.
--------
प्रतिनिधी अस्लम पठाण कर्जत अहमदनगर
stay connected