मा.आ.भीमसेन धोंडे यांची अँड.अजित देशमुख यांनी भेट घेऊन विविध विषयावर केली चर्चा
आष्टी (प्रतिनिधी): जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड.अजित देशमुख यांनी मा.आ.भीमसेन धोंडे साहेब यांची आष्टी येथे निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय, सामाजिक व इतर विषयांवर सविस्तर चर्चा केली.
बीड येथील जेष्ठ विधितज्ञ तथा समाजसेवक आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड.अजित देशमुख यांनी मंगळवार दि.०१ जुन रोजी आष्टी, पाटोदा, शिरुर का. विधानसभेचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांची आष्टी येथील निवासस्थानी भेट घेऊन आष्टी मतदारसंघातील सध्याची कोरोना परिस्थिती, वैद्यकीय समस्या, रुग्ण व नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या विविध समस्या यासह इतर राजकीय, सामाजिक अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आष्टी, पाटोदा व शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात मागील एक महिन्यापासून कोरोना रुग्णांसाठी सुरु केलेल्या अविरत अन्नसेवेबद्दल समाधान व्यक्त करत सतत रुग्णांना थेट आर्थिक, वैद्यकीय मदत तसेच कोरोना महामारीत मागील वर्षी संपूर्ण मतदारसंघात हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना केलेले किराणा साहित्य वाटप यासह सर्व सामाजिक कार्याबद्दल अँड.अजित देशमुख यांनी मा.आ.भीमसेन धोंडे यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी मयुर अजित देशमुख व दैनिक प्रारंभ बीडचे पत्रकार जालिंदर धांडे उपस्थित होते.
stay connected