*पिंपळा ता.आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज (दादा) खटके यांची निवारा बालगृहास मिष्टान्न भोजन......*
*==================================*
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मा.युवराज दादा खटके यांनी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज निवारा बालगृहास सदिच्छा भेट देऊन या बालगृहातील अनाथ,निराधारांच्या मुखी भरला गोड घास सामाजिक काम करताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून समाजामध्ये जगताना आज आपण लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची296वी जयंती निवारा बालगृहातील अनाथ निराधार त्यांच्याबरोबर आज जयंती साजरी करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण करण्याचे काम खटके यांनी केली आहे.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता.जामखेड जि.अहमदनगर या ठिकाणी अनाथ,निराधार,वंचित,लोककलावं वीटभट्टी कामगार,ऊसतोड मजूर,भटके-विमुक्त,आदिवासी घटकातील 65 मुला मुलींच्या शिक्षणासाठी हे बालगृह चालवले जात असून या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नसून हे बालगृह संपूर्णपणे लोकवर्गणीतून चालवले जात आहे,
पिंपळा ता.आष्टी येथील खटके कुटुंबीयांनी या अनाथ निराधाराची तळमळ जाणून अनाथ,निराधारांना एक वेळचे गोड जेवण देऊन या अनाथ,निराधार मुलांना एक आगळा-वेगळा आनंद दिला,
यावेळी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष व पत्रकार युवराज खटके बोलताना म्हणाले की आम्हाला आई वडील असताना देखील शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या अडचणी येत होत्या,या अनाथ निराधारांचा तर खूप मोठा गंभीर प्रश्न असेल या अनाथ मुला-मुलीं करीता ज्यावेळेस शालेय साहित्य,किराणा,अन्नधान्याची,गरज पडेल त्यावेळेस आमचे खटके कुटुंब या निवारा बालगृहास मदत करेल असे बोलताना ते म्हणाले.जामखेड तालुक्यामध्ये देखील अनाथांचा बाप जन्माला आलेला आहे ते म्हणजे ॲड.अरुण जाधव साहेब यांच्या मुळेच गोरगरीब,कष्टकरी अनाथ,निराधार मुलांना पाटी आणि पेन्सिलची ओळख निर्माण झाली आहे या बालगृहाच्या वाटचालीस त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या,
त्यावेळी प्रमुख पाहुण्यांचे बालगृहातील मुलांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले व आलेल्या पाहुण्यांचे शाल गुलाब पुष्प देऊन,सत्कार करण्यात आला,संस्थेची संपूर्ण माहिती निवारा बालगृहाचे अधिक्षक वैजीनाथ केसकर यांनी दिली प्रास्ताविक संतोष चव्हाण सर यांनी केले,यावेळी युवा नेते.अक्षय देवकाते,तरडगावच्या सरपंच सौ,संगीता केसकर,सविता शिंदे,डिसेना पवार,शिक्षक व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
stay connected