*मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने 10 टक्के आरक्षणाच्या श्रेयासाठी लुडबुड करू नये - सलीम जहाँगीर*

 *मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने 10 टक्के आरक्षणाच्या श्रेयासाठी लुडबुड करू नये - सलीम जहाँगीर*



*ईडब्ल्यूएसचे आरक्षण हा मोदी सरकारचा निर्णय; आयत्या पिठावर रेघोट्या नकोत*


बीड ( प्रतिनिधी ) सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा कायम रहावा यासाठी बाजू मांडण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले. मराठा समाज बांधवांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारने आता मात्र ईडब्ल्यूएसचे 10 टक्के आरक्षण दिल्याचे सांगून श्रेय घेण्याची लुडबुड चालवली आहे. खुल्या प्रवर्गासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ईडब्ल्यूएसचे 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय 7 जानेवारी 2019 मध्ये घेतलेला आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर तो प्रवर्ग आपोआपच खुल्या प्रवर्गात येतो त्यामुळे महाविकास आघाडीने श्रेयाचा डंका पिटून आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यापेक्षा  आरक्षण का टिकले नाही ,  अपयश का आले याचे आत्मपरीक्षण करावे. मराठा बांधवाच्या आरक्षणाचे आम्ही समर्थन केले आहे. क्रांती मोर्चात आम्ही हिरहिरीने सहभागी होतो असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. 


मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या उद्देशाने तत्कालीन भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन ग्राम विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा कायदा करून आरक्षण लागू केले होते. मात्र काहीजणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या कायद्याला आव्हान दिले. महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने कायदा रद्द केला. केवळ राज्य सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण कायदा टिकवण्यात अपयशी ठरलेले तिन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आता मात्र ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षणाचा जीआर काढून नाटकीपणा करत आहे. ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षणाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 2019 मध्ये मुस्लिम, ब्राह्मण या खुल्या प्रवर्गासाठी घेतला होता. आता आरक्षणाचा कायदा रद्द झाल्याने आपोआपच मराठा समाज देखील ईडब्ल्यूएस दहा टक्के आरक्षणात आले आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपले अपयश झाकून दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्याचे दाखवून अखंड मराठा समाज बांधवांची दिशाभूल करत आहे. श्रेयासाठी लुडबूड करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आधी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून त्याचा भक्कम पणे पाठपुरावा करावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. गेली 35 वर्ष देशात आणि राज्यात एक हाती सत्ता असतानाही शरद पवार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही ते आता काय देणार ? असा प्रश्न उपस्थित करत स्वतःचे अपयश झाकून केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे आणि मगच पोपटपंची करावी असेही भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.