राशीन येथील कोरोना तपासणीसाठी 12 अहमदनगरला

राशीन येथील कोरोना तपासणीसाठी 12 अहमदनगरला
कर्जत (असलम पठाण) -
राशीन येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने कर्जतचे प्रशासन सतर्क झाले आहे. आज तहसीलदार वाघ यांनी राशीन येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना बाधित महिलेने वास्तव्य केलेला परिसर प्रशासनाकडून सिल करण्यात आला आहे. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती पोलीस व आरोग्य विभागाकडून घेत बारा जणांना नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे. कंटेंटमेंट झोन करणेबाबत आरोग्य विभागाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार वाघ यांनी दिली. राशीन येथे सुमारे २३०० कुटुंबे असून आरोग्य विभागाकडून १०० कुटुंबासाठी एक या पद्धतीने २२ पथके तयार करण्यात आली आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स हे घरोघरी जाऊन याबाबत सर्वेक्षण करीत आहेत. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना तपासणी करण्यासाठी नगरला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे तहसीलदार यावेळी म्हणाले. ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत सरपंचपती भीमराव साळवे, उपसरपंच शंकर देशमुख यांच्यासह कोरोना समितीचे सदस्य व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनीही राशीन येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटींचे ग्रामस्थांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन उपसरपंच शंकर देशमुख तसेच भीमराव साळवे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.